Join us

रसिका सुनिलचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 15:04 IST

सध्या शनायाची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच सध्या शनाया म्हणजे रसिका सुनिल या अभिनेत्रीची ...

सध्या शनायाची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच सध्या शनाया म्हणजे रसिका सुनिल या अभिनेत्रीची एक शॉर्टफिल्म सोशलमीडियावर गाजत असल्याची पाहायला मिळत आहे. फर्स्ट नाईट असे या शॉट फिल्मचे नाव आहे. तिची ही शॉर्टफिल्म सोशलमीडियावर चार दिवसांत लाखभर लोकांनी पाहिली आहे. या शॉर्टफिल्ममध्ये तरुणांनी खोट्या बलात्कार प्रकरणांत अडकू नये म्हणून तयार करण्यात आलेली ही शॉर्टफिल्म आहे.  यामध्ये एका जोडप्याची कहानी दाखवण्यात आली आहे. यातील तरुण हा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर पहिल्यांदा जेव्हा जवळ येतो त्या सर्व घटनेचा तो व्हिडीओ शूट करून ठेवतो. पण त्याला तसे करण्याची गरज का पडली.. त्याने स्वत:च्याच गर्लफ्रेंडचा व्हिडीओ का तयार केला यामागेच त्याची एक मोठी भिती आहे. एकिकडे महिलांवरील अत्याचार बलात्काराची प्रकरणे वाढत असतानाच खोट्या बलात्कार केसचीदेखिल अनेक प्रकरणे समोर येत आहेत. महिला आयोगाच्या आकडेवारीतही हे समोर आलेले आहे. याच मुद्द्यावर या शॉर्ट फिल्मद्वारे भाष्य करण्यात आले आहे. तिची ही शार्ट फिल्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. रसिका सुनिल सध्या माझ्या नवºयाची बायको या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे.या मालिकेतील तिची भूमिका खूपच लोकप्रिय झाली आहे. तिची ही भूमिका निगेटिव्ह असली तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तसेच सध्या तिचा बघतोस काय मुजरा कर हा चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शिक हा चित्रपट आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे.