छोट्या पडद्यावर शनायाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनिल सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. सध्या शनाया फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचे शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कला गेली आहे. मात्र तिथे ती शिक्षणासोबत विविध गोष्टी करताना पहायला मिळते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिथले अपडेट्स देत असते.
नुकतेच तिने स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण घेतले आणि तिला स्कुबा डायवरचे प्रमाणपत्र देखील मिळाले. त्यामुळे आता ती जगात कुठेही स्कुबा डाइव करू शकते.
रसिका सुनीलने याबाबत सांगितले की, मला समुद्र खूप आवडतो आणि बऱ्याच कालावधीपासून मला स्कुबा डायविंग करायची इच्छा होती. त्यामुळे प्रॉपर ट्रेनिंग घेतले. मला यावेळी एक गोष्ट जाणवली की स्कुबा डायविंग हे जबाबदारीचे स्पोर्ट्स आहे आणि इथे सुरक्षित राहण्यासाठी खूप सायन्स आणि टेक्निक महत्त्वाचे आहे. या ट्रेनिंगदरम्यान स्कुबा डायविंगचे बारकावे व आपातकालीन समयी बचावकार्य करण्याचे तंत्र समजले.