Join us
Daily Top 2Weekly Top 5

रसिका आणि आदितीचा 'यू अँड मी' व्हिडिओ अल्बम 'ह्या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 15:15 IST

'यू अँड मी' हा व्हिडिओ अल्बम ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याच्या मेकिंग व्हिडिओची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

ठळक मुद्देशनाया आणि ईशाचा 'यू अँड मी' अल्बमआदिती द्रविडने 'यू अँड मी'ला दिला स्वरसाज'यू अँड मी' अल्बम ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या हटके अंदाजात कटकारस्थाने करत धमाल उडवून देणाऱ्या 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनाया आणि ईशा यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहेच. आपला दोस्ताना कायम ठेवत पुन्हा एकदा बदमाशिया करण्यासाठी या दोघी सज्ज झाल्या आहेत. फक्त आता त्यांचा हा दोस्ताना येऊ घातलेल्या 'यू अँड मी' या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी आहे. हा व्हिडिओ अल्बम ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याच्या मेकिंग व्हिडिओची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

 'जरा सा कट्टा टाकू आता... जरासी बाते तेढीमेढी..., थोडासा किस्सा करू आता...  थोडीशी यादे तेरी मेरी..., करू आम्ही मनमानिया... ऐसी है अपनी यारीया...'  असे म्हणत रसिका सुनील आणि आदिती द्रविड, आपला दोस्ताना या अल्बमच्या माध्यमातून दाखवणार आहेत. या दोघींचा 'यू अँड मी' या अल्बमची व्हिडिओ पॅलेसने निर्मिती केली आहे. अदिती द्रविडने या गाण्याच्या चित्रीकरणावेळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात अदिती व रसिकाला डान्स स्टेप दाखवल्यानंतर त्या डान्स स्टेप करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये फुलवा खामकरदेखील दिसत आहे.

 

'यू अँड मी' या गाण्याची खासियत म्हणजे स्वत: आदिती द्रविड हिने हे गाणे लिहिले असून आदिती आणि रसिकानेच हे गाणे गायले आहे. या अल्बमच्या निमित्ताने रसिकाच्या गायकीची नवी ओळख प्रेक्षकांना होणार आहे. साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. फुलवा खामकर हिने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. लोणावळा येथे चित्रित झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत. अभिनयातल्या रंगानंतर रसिका आणि आदितीच्या संगीताचे सूर ही प्रेक्षक पसंतीस उतरतील अशी आशा आहे.

टॅग्स :रसिका सुनिल