Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बलात्कारी हा बलात्कारीच असतो- नागराज मंजुळे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 15:59 IST

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात विशाल मोर्चे निघत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागराज मंजुळे यांनी ‘बलात्काऱ्याना कोणतीच जात नसते. बलात्कारी ...

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात विशाल मोर्चे निघत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागराज मंजुळे यांनी ‘बलात्काऱ्याना कोणतीच जात नसते. बलात्कारी हा बलात्कारीच असतो त्याच्याविषयी कोणताच युक्तिवाद होऊ शकत नाही’ असे मत व्यक्त केले.भारतीय राज्यघटनेच्या प्रास्तविकाचे वाचन करून रावसाहेब थोरात सभागृहात नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत दुसºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर संमेलनाचे उदघाटन झाले या प्रसंगी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत असून त्यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब विचार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा प्रकारे विचार संमेलनांचे आयोजन करण्यात येत असून नागपूर येथे पहिले विचार संमेलन यशस्वी झाल्यानंतर कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, प्रगतीशील लेखक संघ, आशीर्वाद फाउंडेशन व केटीएटएम महाविद्यालय यांनी संयुक्तरीत्या येथील रावसाहेब थोरात सभागृहात या विचार संमेलनाचे आयोजन केले आहे.