Join us

रॅपर श्रेयश जाधवचे 'पुणे रॅप' नंतर 'वीर मराठे' गाणे रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 16:02 IST

'पुणे रॅप' साँगच्या यशानंतर रॅपर श्रेयश जाधव पुन्हा एकदा एक नवेकोरे रॅपसॉंग रसिकांच्या भेटीला आणण्यास सज्ज झाला आहे.यावेळी त्याने ...

'पुणे रॅप' साँगच्या यशानंतर रॅपर श्रेयश जाधव पुन्हा एकदा एक नवेकोरे रॅपसॉंग रसिकांच्या भेटीला आणण्यास सज्ज झाला आहे.यावेळी त्याने शिवरायांवर आधारित 'वीर मराठे' हे हटके गाणे तयार केले आहे.१५ मार्चला तिथीनुसार झालेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने या गाण्याचा पहिला टिजर पोस्टर रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या स्तुतीपर गायेलेले हे पहिलेच रॅपसॉंग असून,या गाण्याद्वारे तो शिवरायांना मानवंदना देणार आहे.एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रसिद्ध होणारे 'वीर मराठा' या रॅप गाण्याला हर्ष,करण आणि अदित्य यांनी ताल दिला असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन आणि कॉरियोग्राफी केली आहे या गाण्याचे बोल आणि रॅप स्वतः श्रेयश ने लिहिले आणि गायले आहे. प्रत्येक मराठी माणसाला स्फुरण देणारे 'वीर मराठे' हे रॅपसॉंग 'पुणे रॅप' इतकेच गाजेल यात शंका नाही.श्रेयसने यापूर्वी 'ऑनलाईन बिनलाईन' सिनेमातील 'ओ हो काय झालं’ या हरिहरन आणि लेसली लुईस यांच्या गाण्यामध्ये रॅप गायले होते. विशेष म्हणजे मराठी-हिंदी फ्युजन असलेल्या या गाण्याला आणि त्याच्या या रॅप साँगला रसिकांनीही चांगला प्रतिसाद  दिला होता.रसिकांच्या प्रतिसादामुळेच त्याने एक संपूर्ण रॅप असलेलं 'पुणे‘रॅप  साँग रसिकांच्या भेटीला आणले होते. त्याच्या या प्रयत्नालाही रसिकांनी भरभरून पसंती दर्शवली होती.पूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईला हे गाणे ठेका धरण्यास भाग पाडेल, असा श्रेयसचा विश्वास आहे.शिवाय अजून काही रॅप साँगवर  श्रेयस काम करतोय.त्यामुळे या वर्षात   तरुणाला रॅप साँगची झिंग चढवणा हे मात्र नक्की.