Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रणवीर सिंग, बॉबी देओल, तुषार कपूर, जॅकलिन फर्नांडिस, तापसी पन्नू , परिणीती चोप्रा यांना लागले 'बाळा' गाण्याचे वेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:16 IST

गणेश आचार्य हा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांचा लाडका आहे. त्यामुळे गणेशने दिग्दर्शित केलेल्या 'भिकारी' या ...

गणेश आचार्य हा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांचा लाडका आहे. त्यामुळे गणेशने दिग्दर्शित केलेल्या 'भिकारी' या सिनेमाची चर्चा केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही चांगलीच आहे. या चित्रपटातील गाण्यांनीही सध्या सगळ्यांना वेड लावले आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बाळा' या गाण्याने तर हिंदी कलाकारांना देखील वेड लावले आहे. स्वप्निल जोशीवर चित्रित करण्यात आलेल्या या 'बाळा' गाण्याची स्टेप्स सध्या भरपूर व्हायरल झाली असून याचे अनुकरण हिंदीचे प्रसिद्ध स्टारमंडळी देखील करताना दिसत आहेच. डान्स मास्तर गणेश आचार्य यांच्या चित्रपटातील 'बाळा' गाण्यावर रणवीर सिंग, बॉबी देओल, तुषार कपूर, कुणाल खेमू, वरूण धवन, अर्शद वारसी या हिंदी अभिनेत्यांनी तर परिणीती चोप्रा, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू या अभिनेत्रींनी ठेका धरला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात श्रेयस तळपदे हा हिंदीत चमकणारा मराठी चेहरा देखील आपल्याला पाहायला मिळत असून भिकारी चित्रपटाच्या प्रदर्शनाची ही मंडळी आतुरतेने वाट पाहत आहेत. इग्लंड येथे शूट करण्यात आलेल्या या गाण्यात स्वप्निलने पहिल्यांदाच 'हिप हॉप' केलेला पाहायला मिळत असून या गाण्यातील त्याची सिग्नेचर स्टेप खूप गाजत आहे. स्वप्निलच्या चाहत्यांमध्ये देखील हे गाणे खूप प्रसिद्ध झाले आहे. स्वप्निलने या गाण्यात तुफान डान्स केला आहेय या गाण्यासाठी त्याने घेतलेली मेहनतदेखील यात दिसून येत आहे.मी मराठा फिल्म प्रॉडक्शन शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच जीसिम्सचे कार्तिक निशानदार व अर्जुन बरन प्रस्तूत हा सिनेमा येत्या ४ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यात ऋचा इनामदार ही नवोदित अभिनेत्री झळकणार असून कीर्ती आडारकर, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत असतील. Also Read : रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे या कलाकरांच्या उपस्थितीत झाले 'भिकारी' सिनेमाचे साँग लॉंन्च