Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रानबाजार' फेम माधुरी पवारने खरेदी केले नवीन घर, व्हिडीओ शेअर करून दाखवली घराची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 10:30 IST

Madhuri Pawar : उत्तम अभिनयशैली आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, माधुरीचा हा प्रवास सोपा नव्हता. अत्यंत गरीब कुटुंबातून माधुरी वर आली असून तिने तिच्या हिमतीवर तिचं सारं विश्व निर्माण केलं आहे.

'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' या आणि अशा अनेक मालिका, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार (Madhuri Pawar). उत्तम अभिनयशैली आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, माधुरीचा हा प्रवास सोपा नव्हता. अत्यंत गरीब कुटुंबातून माधुरी वर आली असून तिने तिच्या हिमतीवर तिचं सारं विश्व निर्माण केलं आहे. माधुरी आज मराठी कलाविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दरम्यान आता तिने नवीन घर खरेदी केले आहे आणि या घराची झलक व्हिडीओ शेअर करून दाखवली आहे.

अभिनेत्री माधुरी पवार हिने इंस्टाग्रामवर नवीन घराच्या गृहप्रवेशादरम्यानचा व्हिडीओ शेअक करत लिहिले की, नमस्ते वास्तु पुरुषाय भूषाय भिरत प्रभो | मद्गृहं धन धान्यादि समृद्धं कुरु सर्वदा | नवीन घर. स्वप्नपूर्ती. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. कमेंट्समध्ये नेटकरी तिचे खूप कौतुक करत आहेत. 

माधुरीने तिच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश करून तिचे घर घेण्याचे स्वप्न साकार केले आहे. ५ जानेवारी रोजी माधुरीने तिच्या या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. तिच्या स्वप्नातल्या घराची झलक तिने एका व्हिडिओतून दाखवली आहे. घराचे इंटेरिअर तिने खूपच विचारपूर्वक केलेले आहे. घराचा मुख्य दरवाजा आकर्षक डिझाईनने सजवलेला पाहायला मिळतो. तर इंटेरिअरसाठी तिने डार्क चॉकलेटी आणि सफेद रंगांची थीम निवडली आहे.