आर्चीला रजनीकांत यांच्या बाउन्सर्सची सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 12:10 IST
महाराष्ट्रासहित संपूर्ण राज्यात देखील सैराटची लोकप्रियता अफाट आहे हे जगजाहीर आहे. महाराष्ट्रात आर्चीला अक्षरश: बारा-बारा बाउन्सर्स घेऊन बाहेर पडावे ...
आर्चीला रजनीकांत यांच्या बाउन्सर्सची सुरक्षा
महाराष्ट्रासहित संपूर्ण राज्यात देखील सैराटची लोकप्रियता अफाट आहे हे जगजाहीर आहे. महाराष्ट्रात आर्चीला अक्षरश: बारा-बारा बाउन्सर्स घेऊन बाहेर पडावे लागत असे. चक्क शाळेचा पहिल्या दिवशीदेखील आर्चीला बाउन्सर्सच्या घेहरातूनच जावे लागले. तिला सर्वसामान्यांप्रमाणे बाहेर पडता येणे ही आता अशक्य झाले आहे. आर्चीच्या या अफाट लोकप्रियतेचे हे चित्र आता महाराष्ट्रातच नाही तर परराज्यातदेखील दिसू लागले आहे. तिला परराज्यातदेखील बाउन्सर्ससहितच जावे लागते. नुकतीच सैराट टीम नागराज मंजुळे यांच्यासोबत चित्रपटाच्या प्रिमियर शोसाठी हैदराबादमध्ये गेली होती. यावेळी आर्चीला सुपरस्टार रजनीकांत यांच्या बाऊन्सर्सची सुरक्षा देण्यात आली. तसेच दक्षिणेकडील स्टार मंडळी रजनीकांत, प्रभास, महेशबाबू, अल्लू अर्जुन यांच्या बाऊन्सर्सने सैराटमधील कलाकार आर्ची, सल्ल्या, प्रदीप आणि आनी यांना देखील सुरक्षा दिली. दाक्षिणात्य सिनेमातील स्टार्सच्या आजूबाजूला असणारे बाऊन्सर्स आर्चीच्या अवतीभोवती कडे करुन दिसत होते. तर आर्ची आणि नागराजला सुरक्षा देताना आम्हाला आनंद झाल्याचे देखील यावेळी बाऊन्सरने सांगितले.