रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. आज मुंबईत संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आणि अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर पाहून 'राजा शिवाजी' या भव्यदिव्य सिनेमाबाबत चाहत्यांच्या अपेक्षा आता आणखीणच वाढल्या आहेत. या ट्रेलर लाँन्चवेळी रितेशने त्याच्या भावना व्यक्त केल्या. तेव्हा रितेश आणि जिनिलिया दोघेही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
रितेश म्हणाला, "मी जन्माला आलो आईवडिलांना पाहिलं, देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. महाराज काय आहेत हे सांगायची गरज नाही. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो , किल्ले बनवले, झेंडे लावले. नेहमी वाटलं आपण महाराजांचे मावळे आहोत. महाराज आहोत असं कधी वाटलं नाही आणि वाटणारही नाही. कोणतीही कलाकृती आपण करतो तेव्हा आदर, प्रेम, भावना, आस्था हीच भावना मनात असते. २०१६ ला प्रयत्न केला सिनेमा बनवण्याचा, नाही झाला. २०१९ ला प्रयत्न केला नाही झाला कुठेतरी महाराज म्हणत असतील, थांब पोरा तुझी वेळ आलेली नाहीये. २०२३ ला पुन्हा प्रयत्न केला. आता महाराज म्हणतील. पोरा आज तुझी वेळ आलेली आहे".
'राजा शिवाजी' सिनेमासाठी योगदान दिलेल्या प्रत्येकाचे रितेशने यावेळी आभार मानले. "मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. पण हे सगळं होत असताना अशी एक व्यक्ती होती जिच्याशिवाय हे घडूच शकलं नसतं तर ती आहे जिनिलिया. स्वप्न पाहणं सोपं असतं...स्वप्नांना काय असतं...पाहिलं स्वप्न...पण ती साकार करण्याची जिद्द असते. ज्यात जिनिलियाने एक निर्माती म्हणून नेहमी साथ दिली", असं रितेशने म्हणताच जिनिलियालाही अश्रू अनावर झाले.
रितेश देशमुखला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पाहून चाहते थक्क झाले आहेत. 'राजा शिवाजी' सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं आहे. या सिनेमात बॉलिवूड कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळत आहे. जिनिलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक बच्चन संभाजी महाराज, संजय दत्त अफजल खान, भाग्यश्री माँसाहेब जिजाऊ यांच्या भूमिका साकारणार आहेत. याशिवाय फरदीन खान, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १ मे रोजी 'राजा शिवाजी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : At the 'Raja Shivaji' trailer launch, Riteish Deshmukh emotionally thanked Genelia for her unwavering support as a producer. He acknowledged her crucial role in making his dream project a reality. The film releases May 1st.
Web Summary : 'राजा शिवाजी' के ट्रेलर लॉन्च पर रितेश देशमुख ने जेनेलिया को निर्माता के रूप में उनके अटूट समर्थन के लिए भावुक धन्यवाद दिया। उन्होंने अपने ड्रीम प्रोजेक्ट को साकार करने में उनकी महत्वपूर्ण भूमिका को स्वीकार किया। फिल्म 1 मई को रिलीज होगी।