Join us

Teaser : हर हर महादेव...! मराठी चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज; तुम्हीही म्हणाल, क्या बात!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 12:22 IST

Har Har Mahadev Teaser : राज ठाकरे यांच्या आवाजातील हा टीझर पाहिला नाही तर काय पाहिलं!

Har Har Mahadev Teaser : राज ठाकरे  (Raj Thackeray) हे नाव घेतलं तरी त्यांची धारदार भाषणं, त्यांनी साकारलेली व्यंगचित्र असं सगळं डोळ्यांपुढे येतं. याशिवायही त्यांची एक ओळख आहे. राज ठाकरे हे एक मोठे कलाप्रेमीही आहेत. चित्रकला असो वा चित्रपट यांच्यावर त्यांचं मनापासून प्रेम आहे. क्चचित प्रसंगी त्यांच्यात दडलेली हा खास माणूस सर्वांसमोर येतो. आता राज ठाकरे यांनी एका ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरला आवाज दिलाय. चित्रपटाचं नाव आहे, ‘हर हर महादेव’.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारा, मराठी माणसाच्या हृदयात वसलेली, महाराष्ट्राच्या बुलंद आवाजातली स्वराज्याची सुवर्णगाथा सांगणाराअभिजित देशपांडे (Abhijeet Deshpande) दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तूर्तास या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे आणि या टीझरला राज ठाकरे यांनी आपला आवाज दिलाये.

टीझरचं पहिलं वाक्य कानी पडताच, राज यांचा दमदार, बुलंद आवाज खिळवून ठेवतो. पुढे तर टीझरमधील राज यांच्या आवाजातील प्रत्येक वाक्य ऐकताना अंगावर जणू शहारा येतो.

‘ जेव्हा माय माऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वषार्नंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माज्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..हर हर महादेव...,’ असा राज ठाकरे यांच्या आवाजातील हा टीझर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.झी स्टुडिओ आणि गणेश मार्केटींग फिल्म्स निर्मित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर पे्रक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :राज ठाकरेसिनेमा