शूटच्या पहिल्याच दिवशी स्रेहाचे रॅगिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 20:09 IST
‘लाल इश्क’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणºया स्रेहाचे शूटच्या पहिल्याच दिवशी मस्ती म्हणून रॅगिंग करण्यात आले. ...
शूटच्या पहिल्याच दिवशी स्रेहाचे रॅगिंग
‘लाल इश्क’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणºया स्रेहाचे शूटच्या पहिल्याच दिवशी मस्ती म्हणून रॅगिंग करण्यात आले. झाले असे की, स्रेहाचा पहिला सीन शूट करण्याच्या वेळेस सर्वांनी तिला सांगितले की, कॅमेरामनला पहिल्यांदा एकशे रुपये देऊनच सीनला सुरूवात करायची आणि तिने खरोखरच एकशे एक रुपये कॅमेरा दादांना दिले व मागून सर्वजण एकच कल्ला करत हसू लागले. स्रेहाचा संपुर्ण टीम सोबत काम करण्याचा अनुभव धमाल आणि अविस्मरणीय होता.झक्कास हिरोईन सीझन २ चे विजेतेपद स्रेहा चव्हाणने पटकावलं. सुपरस्टार स्वप्नील जोशीची नायिका होण्याबरोबर संजय लीला भन्साळी यांचा पहिला मराठी चित्रपट ‘लाल इश्क’ मध्ये झळकण्याची सुवर्णसंधी स्रेहाला मिळाली आहे.