Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्वांटिटीपेक्षा क्वालिटी काम करायचेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 13:40 IST

     प्रियांका लोंढे                दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अशी अनेक बिरुदे मिरविणारे केदार ...

     प्रियांका लोंढे       
         दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अशी अनेक बिरुदे मिरविणारे केदार शिंदे यांच्या गेला उडत या नाटकाचे नुकतेच शंभर प्रयोग झाले आहेत. सध्या हे नाटक सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. सिदधार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाने नाट्यरसिकांवर मोहिनी घआतली आहे. याच नाटकाच्या संदर्भात केदार शिंदे यांनी लोकमत सीएनएक्सशी साधलेला हा मनमोकळा संवाद...
 
 गेला उडत या नाटकाचे नुकतेच शंभर प्रयोग झाले आहेत, याबद्दल काय सांगाल?
-: गेला उडत या नाटकाचे शंभर प्रयोग होेणे ही आमच्यासाठी फआर मोठी अचिव्हमेंट आहे. नुकताच या नाटकाचा शंभरावा प्रयोग झाला त्याबद्दल निश्चितच आम्हाला आनंद होत आहे. जेव्हा प्रेक्षक तुमच्या कलाकृतीवर भरभरुन प्रेम करतात तेव्हा पुढे अजुन चांगल काम करण्यासाठी दडपण देखील येते. सिदधार्थने या नाटकात अतिशय चांगले काम केले आहे. मी केवळ त्याच्यासाठीच हे नाटक लिहीले होते. 
 
 
मराठी मालिकेचे दिग्दर्शन तुम्ही पुन्हा कधी करणार आहात?
 -: सध्याचे लेखक आणि दिग्दर्शक अगदी क्लार्कच्या पातळीला आल्याचे मला वाटतेय. कारण एकजण तुम्हाला काहीतरी सांगत असतो आणि तेच तुम्ही जसेच्या तसे उतरवित असता. पुढे कॅमेºयात देखील तिच कथा आहे तशी मांडली जाते. यामध्ये माझे स्वत:चे असे काही कौशल्य नसते. त्यामुळे मला नेहमीच काहीतरी क्रिएटिव्ह आणि माझ्या स्टाईलने काम करायला आवडेल. आणि मला नाही वाटत की त्या टिआरपीच्या गणितात माझी स्टाईल कामी येईल. 
 
बरेचसे कलाकार चित्रपटसृष्टीत येण्याची धडपड करीत असतात त्यांना तुम्ही काय सांगाल?
-: आम्ही ज्यावेळी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले तेव्हा फारच कमी स्पर्धा होती. पण आता चित्र बदलले आहे. मी माझा प्रवास एकांकिका स्पर्धा ते चित्रपटसृष्टी असा केला आहे. आधी मी पण अ‍ॅक्टींग करण्यासाठीच आलो होतो. परंतू नंतर मी माझ्यातील लेखक- दिग्दर्शकाला ओळखले आणि आता हेच करायचे असे ठरविले. त्यामुळे सध्याच्या तरुण कलाकारांना मी माझे अनुभव शेअर करताना हेच सांगीन की तुम्ही अ‍ॅक्टर होऊ शकता का हा प्रश्न आधी स्वत:ला विचारा आणि मगच या क्षेत्रात पाऊल ठेवा.
 
चित्रपटात अभिनय करताना तुम्ही प्रेक्षकांना कधी दिसणार?
-: एखादया दिग्दर्शकाने जर मला चांगल्या कथेसाठी विचारले तर मी निश्चितच प्रेक्षकांना अभिनय करताना दिसू शकेल. मी माझ्या करिअरची सुकुवात अभिनयापासूनच केली होती. त्यामुळे मला माहितीय कि जेव्हा कलाकार कॅमेºयासमोर उभा राहतो तेव्हा त्याच्या मनातील विवंचाना, विचार सर्व काही विसरुन तो फक्त अभिनय करण्यावरच लक्ष केंद्रित कतो. एखादी चांगली संधी मिळाली तर मी नक्कीच अभिनय करीन. 
 
सध्या रंगभूमीवर तुमची अनेक नाटके सुरु आहेत,पण प्रेक्षकांना तुमचा चित्रपट कधी पाहायला मिळणार?
-: होय, सध्या नाटकांमध्ये मी जरी व्यस्त असलो, तरी सुदधा यावर्षी माझा एक मराठी चित्रपट नक्कीच येणार आहे. हा चित्रपट २०१७ मध्येच प्रदर्शित होईल याची मी खात्री देतो. त्यामुळे याचवर्षी प्रेक्षकांना चित्रपट पाहायला मिळणार आहे.