Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लग्नाला कलाकारांची मंदियाळी, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 16:38 IST

मराठी सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. यादरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. त्यांच्या लग्नाचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. मराठी चित्रपटसृष्टीमधील अशाच एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या दिग्दर्शकाच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यादरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सुबोध भावेच्या पुष्पक विमान चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेल्या वैभव चिंचाळकर असं या दिग्दर्शकाचं नाव आहे. वैभवने याआधी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. वैभवला शुभेच्छा देण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नाला हजेरी लावलेल्या कलाकारांनी सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कलाकारमंडळींनी धमाल-मस्ती केल्याचं दिसून येत आहे.

वैभवच्या लग्नसोहळ्याला सुयश टिळक, सायली संजीव,  सुबोध भावे, मंजिरी भावे, सुकन्या मोने, ऐश्वर्या नारकर यासारख्या सुप्रसिद्ध कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. सोशल मीडियाद्वारेही वैभव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :सुबोध भावे सुयश टिळकसायली संजीव