Join us

पुष्करची जंगल सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 17:43 IST

आयुष्यात एकदा तरी बाइक रायडिंग, जंगल सफर करायला मिळणे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यात जंगल सफरचा आनंद लुटणे म्हणजे ...

आयुष्यात एकदा तरी बाइक रायडिंग, जंगल सफर करायला मिळणे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यात जंगल सफरचा आनंद लुटणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखेच असते. असेच काहीतरी अभिनेता पुष्कर जोगच्या बाबतीत घडले आहे. हा अभिनेता सध्या दक्षिण आफ्रिकेच्या जंगलची सफर करत आहे. पुष्करने जंगलची सफर करतानाचे काही फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहे. या फोटोमध्ये पुष्कर मस्तपैकी मिनी ट्रेनमध्ये बसून जंगलच्या भटकंतीचा आनंद लुटत आहे. ट्रेनच्या विंडोसीटमधून मागे दिसणारा हत्ती हा पुष्करला प्रचंड भावलेला दिसत आहे. कारण धावत्या ट्रेनच्या विंडो खिडकीतून दिसणाºया हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा मोह पुष्करला आवरलेला दिसत नाही. त्याच्या या जंगल सफारीच्या झक्कास सेल्फीला सोशलमीडियावर प्रचंड लाइक्सदेखील मिळताना दिसत आहे.