Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोतील 'हा' चिमुकला आता आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता, ३१ वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांच्यासोबत केलेलं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:07 IST

अभिनेत्यानेच त्याची एक जुनी आठवण शेअर केली आहे. या फोटोमध्ये अभिनेता ऋषी कपूर आणि पूजा भट यांच्याबरोबर दिसत आहे.

अनेक सेलिब्रिटी हे बालकलाकार म्हणूनच सिनेइंडस्ट्रीतील त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात करतात. काही सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो किंवा एखाद्या सिनेमात केलेल्या कामाचे फोटो व्हायरल होताना दिसतात. सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो पाहून ते नक्की कोण आहेत, हे ओळखणेही बऱ्याचदा चाहत्यांना जमत नाही. असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप पाडली आहे. 

सध्या एका मराठी अभिनेत्याचा फोटो समोर आला आहे. अभिनेत्यानेच त्याची एक जुनी आठवण शेअर केली आहे. या फोटोमध्ये अभिनेता ऋषी कपूर आणि पूजा भट यांच्याबरोबर दिसत आहे. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या हम दोनो या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा हा फोटो आहे. ३१ वर्षांपूर्वी ऋषी कपूर आणि पूजा भट यांच्याबरोबर काम केल्याची ही आठवण अभिनेत्याने शेअर केली आहे. "नोव्हेंबर १९९३ सिनेमा हम दोनो. ३१ वर्षांपूर्वी ऋषी कपूर सर आणि पूजा भट मॅम यांच्याबरोबर गाण्याचं शूटिंग", असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोला दिलं आहे. 

फोटोतील जीन्स, शर्ट आणि डोक्यावर टोपी घातलेला हा चिमुकला आता प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे. पण, त्याला या फोटोवरुन ओळखणं कठीण जात आहे. कारण, हा फोटो ३१ वर्षांपूर्वीचा आहे. फोटोत दिसणारा हा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग आहे. पुष्करने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'जबरदस्त' या सिनेमामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. अलिकडेच त्याचा 'AI द धर्मा स्टोरी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

टॅग्स :पुष्कर जोगऋषी कपूरपूजा भटमराठी अभिनेता