Join us

Exclusive पूजाच्या नावाखाली चित्रपटाची पब्लिसीटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 13:41 IST

प्रियांका लोंढे                   बºयाचदा सिनेमा सुपरहिट होण्यासाठी अनेक कल्पना लढवल्या जातात. ...

प्रियांका लोंढे
                   बºयाचदा सिनेमा सुपरहिट होण्यासाठी अनेक कल्पना लढवल्या जातात. मग चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबला जातो. असेच काही झाले आगामी चार्ली इज बॅक या सिनेमाबाबत. तुम्ही म्हणाल की नक्की या सिनेमाने केले तरी काय. तर त्याचे झाले असे की या चित्रपटाचा नूकताच मुहूर्त करण्यात आला आहे. या सिनेमातील संपूर्ण कलाकारांची नावे जाहिर करण्यात आली आहेत. या नावांमध्ये एक नाव आहे अभिनेत्री पूजा सावंतचे. या सिनेमातील पूजाच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला असता तिने लोकमत सीएनएक्सला सांगितले की, ह्लमी या सिनेमात काम करीत नाहीये. एवढेच काय तर मला या सिनेमाबद्दल काहीच माहित नाही. माझ्याकडे कोणी कथा ऐकविण्यासाठी देखील आले नाही. किंवा या चित्रपटासंदर्भात मला कोणतीच व्यक्ती अजूनतरी भेटलेली नाही. मी जेव्हा या सिनेमातील कलाकारांच्या नावामध्ये माझे नाव वाचले तेव्हा मलाही आश्चर्य वाटले. माझा होकार नसताना माझे नाव देण्यात आले आहेह्व. तसेच दिग्दर्शक प्रकाश भालेकर यांच्याशी संवाद साधला असता ते सांगतात,ह्लआमच्या चित्रपटात अभिनेत्री पूजा सावंत एका पत्रकाराची भूमिका साकारत आहेह्व. दिग्दर्शकांनी तर पूजा सावंत चित्रपटात असल्याची कबुली दिली आहे. परंतु पूजाने ही बातमी साफ खोटी असून मी हा सिनेमा करीत नसल्याचे सीएनएक्सशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे आपल्याला असेच म्हणावे लागेल की पूजाच्या नावाखाली चित्रपटाची पब्लिसीटी तर होत नाही ना ?