Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या`नाईट स्काय`च्या क्षितीजावर ग्वाल्हेर घराण्याच्या पं. शरद साठे यांचा स्वरसाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 10:06 IST

पंडीत शरद साठे, हे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध ख्याल गायक असून शास्त्रीय संगिताच्या विजयी इतिहासाशी जवळचा संबंध असलेल्या मुंबईतल्या हाताच्या ...

पंडीत शरद साठे, हे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध ख्याल गायक असून शास्त्रीय संगिताच्या विजयी इतिहासाशी जवळचा संबंध असलेल्या मुंबईतल्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या प्रसिद्ध संगीतज्ञांपैकी ते एक श्रेष्ठ व ज्येष्ठ कलाकार आहेत. १९५० पासून म्हणजे, गेल्या चार दशकांपासून त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या काही निष्णात गुरूंकडून सातत्यपूर्ण व थेट प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगिताची सहा दशकांहून अधिक काळ संगीतकार, गुरू, कला व्यवस्थापक आणि दिग्गज कलावंत अशा विविध भूमिकांतून अथक सेवा केली आहे.फर्स्ट एडिशन आर्टतर्फे महालक्ष्मी येथील जी ५ ए ब्लॅक बॉक्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नाईट स्काय या उत्कट मैफलीत पं. शरद साठे उत्तररात्रीच्या स्वरांचा सुरेल आविष्कार सादर करणार आहेत. ही मैफल रात्री ८.३० ते ११.३० वाजेपर्यंत रंगेल. सामान्यतः रात्रीचे राग नेहमीच्या मैफलींमध्ये आळवले जात नाहीत. याच रागांमधील पं. साठे यांच्या गुरूंच्या काही निवडक रचना यावेळी पंडीतजींच्या स्वरांतून ऐकण्याची संधी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे. या मैफलीच्या माध्यमातून, उत्कट आणि आलिशान असा हिंदुस्थानी ख्याल गायकीचा रसास्वाद घेण्याकरिता संगीतप्रेमी मंडळी आणि कलाप्रेमी रसिक एकत्र येणार आहेत. पं. साठेंसारख्या निष्णात आणि अख्खे आयुष्य संगिताला वाहिलेल्या ज्येष्ठ संगीतज्ञाकडून आळवल्या गेलेल्या अशा मैफली फारच खास रंगतात.मार्च २०१७ मध्ये फर्स्ट एडिशन आर्ट्सतर्फे आयोजित केलेल्या संगीतमालिकेत साठे साहेबांनी सिक्रेट मास्टर्सपैकी एक असल्याची भूमिका पार पाडली होती. सामान्यतः प्रसिद्धी न मिळालेल्या परंतु, अतिशय विद्वान आणि तज्ञ कलाकारांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला होता.