गायकांना स्टेजवर सतत एनर्जेटीकच राहावे लागते. प्रेक्षकांना जर आपल्या परफॉरमन्सनी खुष करायचे असेल तर स्टेज वर धमाल करावीच लागते. अशीच धमाल, मजा आणि मस्ती सिंगर प्रियांका बर्वे व जसराज जोशी यांनी केली आहे. नूकतेच या दोघांचे फोटो प्रियांकाने फेसबूकवर अपलोड केले आहेत. ती या फोटोविषयी सांगताना, म्हणतेय क्रेझीनेस अनलिमिटेड. एका स्टेजवर गाताना मजा करतानाचे या दोघांचेही हे फोटो सोशल साईट्सवर मात्र अनेकजण लाईक्स करीत आहेत. या फोटोविषयी अजून काही गोष्टींचा उलगडा ती लवकरच करणार असल्याचे तिने फेसबूकवर सांगितले आहे. मग हा परफॉरमन्स चित्रपटातील सीन साठी आहे की मालिकेसाठी शूट केलाय हे आपल्याला लवकरच समजेल.
प्रियांका-जसराजचा क्रेझीनेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 16:07 IST