प्रियदर्शन जाधव आणि सोनाली कुलकर्णी ही हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 17:33 IST
मराठी चित्रपटसृष्टीत आता प्रेक्षकांना एक हटके जोडी पाहायला मिळणार आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अशी ही ...
प्रियदर्शन जाधव आणि सोनाली कुलकर्णी ही हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार
मराठी चित्रपटसृष्टीत आता प्रेक्षकांना एक हटके जोडी पाहायला मिळणार आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अशी ही हटके जोडी असणार आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित एका आगामी चित्रपटात ही जोडी झळकणार आहे. या दोन्ही कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट केले आहेत. आता मात्र हे दोघ एकत्रित एका चित्रपटात दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हे खास सरप्राईज असणार आहे. या चित्रपटाचे काही चित्रिकरण नुकतीच हंपी येथे करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा सध्या खूपच रंगत असल्याचे दिसत होते. त्याचबरोबर या चित्रपटात प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही जोडीदेखील याच चित्रपटात असणार आहे. म्हणजेच जुळून येथील रेशीमगाठी या मालिकेनंतर ही जोडी पुन्हा एकदा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचे नाव अदयाप ही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर असणार आहे हे तर प्रेक्षकांना माहितच होते. आता नुकतेच अभिनेता प्रियदर्शन जाधव असणार असल्याचे कळाले. चला तर, आगामी चित्रपटाच्या निमित्ताने नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी यापूर्वी & जरा हटके,कॉफी आणि बरंच काही असे अनेक चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. तसेच त्यांचा सायकल हा चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे. नुकतेच त्याच्या या चित्रपटाला कोल्हापूर फिल्म फेस्टीव्हलमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.