Join us

प्रिया मराठे लागली गणपतीच्या तयारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 15:01 IST

गणेश उत्सावाची तयारी गल्लोगल्ली चालू असल्याचे दिसत आहे. प्रत्येक तरूण मोठया उत्साहाने गणेश आगमनाच्या तयारीला लागला आहे. घराघरातदेखील हे ...

गणेश उत्सावाची तयारी गल्लोगल्ली चालू असल्याचे दिसत आहे. प्रत्येक तरूण मोठया उत्साहाने गणेश आगमनाच्या तयारीला लागला आहे. घराघरातदेखील हे चित्र पाहायला मिळत आहे. मग यामध्ये मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. आता हेच बघा ना, अभिनेत्री प्रिया मराठे देखील मोठया आनंदाने गणेश आगमनाची तयारी करीत आहे. तिच्यासोबत तिचे बहिण - भाऊ देखील तिच्या मदतीला लागलेले दिसत आहे. प्रिया तर हॅन्डग्लोज घालून गणेश उत्सावाच्या तयारीत मग्न असल्याचे फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.  तिने गणेश उत्सावाच्या तयारीचे हे फोटो सोशलमिडीयावर अपडेट केले आहे. तसेच प्रिया सांगते की, यंदा काहीतरी हटके व नवीन डेकोरेशन करणार अहोत. बाप्पा यायची फुल्ल आॅन तयारी चालू आहे. या गणेश उत्सावात एकदम धमाल व मजा करणार आहोत.