प्रिया बाटपने केले कवितावाचन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 17:02 IST
प्रिया बापट आज मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री मानली जाते. तिच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. टाइमपास या चित्रपटात ...
प्रिया बाटपने केले कवितावाचन
प्रिया बापट आज मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री मानली जाते. तिच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. टाइमपास या चित्रपटात तिने साकारलेली प्राजक्ता ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना खूप आवडली होती. नुकत्याच आलेल्या वजनदार या चित्रपटासाठी तर तिने चक्क कित्येक किलो वजन वाढवले होते आणि त्यानंतर कमीदेखील केले होते. सध्या ती अभिनय करण्यासोबतच आणखी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहे. प्रियाने एका अल्बमसाठी नुकतेच कवितावाचन केले आहे. प्रेम आणि पाऊस या दोन्ही गोष्टी सगळ्यांच्या खूप जवळच्या असतात. पहिला पाऊस, पहिले प्रेम हे तर सगळ्यांसाठीच खूप स्पेशल असते. अशाच पाऊसाचे आणि प्रेमाचे नाते सांगणाऱ्या पहिला पाऊस या कवितेला प्रियाने तिचा आवाज दिला आहे. फिलिंग या म्युजिकल अल्बममधील हे गाणे असून या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच करण्यात आले. पहिला पाऊस या कवितेविषयी प्रिया सांगते, "पाऊस हा माझा सगळ्यात आवडता ऋतू आहे. मी ही कविता लिहिली नसली तरी या कवितेचे वाचन मी केलेले आहे. कविता वाचन करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. पण मी हे खूप एन्जॉय केले. एका अल्बमसाठी कविता वाचन करण्याचा अनुभव खूपच चांगला होता." पहिला पाऊस या गाण्याचे दिग्दर्शन संगीतकार किरण खोत यांनी केले आहे तर हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. प्रियाने व्हाईस ओव्हर दिलेले गाणे सगळ्यांना आवडेल अशी या टीमला खात्री आहे.फिलिंग्स या म्युझिक अल्बममध्ये 12 दिग्गज कलाकारांनी गाणी गायले असून 12 प्रसिद्ध कलाकारांचा आवाज या अल्बमला लाभला आहे.