Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिया बापटच्या "त्या" बोल्ड सीनबद्दल वडील काय म्हणाले? अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 14:14 IST

प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे.

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे. 'सिटी ऑफ ड्रिम्स' तिची ही वेबसीरिज चांगलीच गाजली. या सीरिजमधील तिचे बोल्ड सीन पाहिल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. सीरिजमधील बोल्ड सीन सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले. नुकतंच प्रिया बापटने याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.

प्रिया बापटने आरपारच्या 'वूमन की बात' या सेगमेंटमध्ये बोल्ड सीनबद्दल आई-वडिलांना काय वाटलं? याबद्दल भाष्य केले. ती म्हणाली, 'सिटी ऑफ ड्रिम्स'चा पहिला सीझन आल्यानंतर एक क्लिप व्हायरल झाली होती आणि मलाच माहिती नव्हतं की असं काय झालं. कारण, मी एपिसोड खूप उशीरा पाहिले. आम्ही प्रमोशन करत होतो. त्यामुळे एपिसोड आल्यावर सगळे लगेच बघितले नाहीत. तर मला कोणाकडून ती क्लिप आली आणि मी पहिला फोन बाबांना केला'.

पुढे ती म्हणाली, 'त्यांना सांगितलं की मी असे काही सीन केले आहेत आणि तुमच्यापर्यंत कुठुन क्लिप पोहचली तर तुम्हाला बाहेरून कळायला नको. म्हणून मी आधीच सांगते. मी असा एक सीन केलाय. तर तुमचं काय म्हणणं आहे. तुम्हाला माझी लाज नाही ना वाटत आहे. माझ्या वडिलांनी आणि आईने एका शब्दात एका वाक्यात मला सांगितलं. ते म्हणाले, हे तुझ्या कामाचा भाग आहे. तु हे काम म्हणून केलसं. काम म्हणून ते स्वीकारलं. आम्हाला त्यात काही गैर वाटत नाही. तु विसरुन जा, दुर्लक्ष कर'.

सिटी ऑफ ड्रीम्स' सिझन 1 हा 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर सीरिजच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. तर चौथ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, 'प्रोडक्शन नंबर ८' या बॉलिवूड सिनेमात तिची वर्णी लागली आहे. सेजल सेठ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून यामध्ये प्रिया अभिनेता नवाजु्द्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ९०च्या काळातील गोष्ट या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. 

टॅग्स :प्रिया बापटसेलिब्रिटीमराठी अभिनेता