Join us

प्रियाने शेअर केला पती उमेश कामतसोबतचा रोमँटिक मूडमधील फोटो, सेलिब्रेटींनी केला कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 11:29 IST

मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात.

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. दोघे ही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रियाने पती उमेश कामतसोबतचे रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये दोघांमधलं जबरदस्त बॉन्डिंग दिसतेय. सेलिब्रेटींसह चाहत्यांनीही प्रिया आणि उमेशच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला.

उमेश आणि प्रिया यांच्या वयात 8 वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षाचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केले. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत