Join us

"उकडीचा मोदक दिसल्यावरचा आनंद", प्रिया बापटच्या फोटोवर यूजर्सने केलेली कमेंट आली चांगलीच चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 15:19 IST

करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे.

करिअरची सुरुवात केल्यापासून प्रिया बापटने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. लवकरच ती एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव फादर लाइक असे आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे. याशिवाय 'प्रिया सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील झळकणार आहे.

सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. प्रियाने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती फ्रेश मूडमध्ये कॅमेऱ्याकडे बघून हसताना दिसतेय. सोशल मीडियावर तिचा हा फोटो व्हायरल झाला आहे. प्रियाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना ही आवडला आहे. एका यूजरने उकडीचा मोदक दिसल्यावरचा आनंद अशी कमेंट केली आहे. या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती.

टॅग्स :प्रिया बापट