Join us

हैदराबादच्या रस्त्यावर प्रिया बापटची रिक्षातून सवारी, फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 16:58 IST

Priya Bapat : सध्या प्रिया हैदराबादच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत आहे. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (priya bapat). उत्तम अभिनयामुळे कायम चर्चेत येणारी प्रिया गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तिच्या नाटक, वेबसीरिज आणि सिनेमांमुळे चर्चेत येत आहे. दरम्यान आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या प्रिया हैदराबादच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत आहे. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

प्रिया बापटने इंस्टाग्रामवर हैदराबादमधील फोटो शेअर करत लिहिले की, हैदराबादच्या रस्त्यावर. या फोटोत प्रिया हैदराबादच्या रस्त्यावर रिक्षेत बसून फोटोशूट करताना दिसली. यावेळी प्रियाने ब्लॅक टीशर्ट आणि खाकी रंगाची पॅण्ट. स्पोर्ट शूज आणि डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये ती दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप भावतो आहे.

प्रियाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहते या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. प्रिया हैदराबादला का गेली आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र नुकतेच तिने सोशल मीडियावर तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ती लवकरच बॉलिवूडच्या सिनेमांत झळकणार आहे. तिला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. 'प्रोडक्शन नंबर ८' या बॉलिवूड सिनेमात प्रियाची वर्णी लागली आहे. सेजल सेठ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून यामध्ये प्रिया नवाजु्द्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ९०च्या काळातील गोष्ट या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. 

टॅग्स :प्रिया बापट