Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उमेश कामत सोबतच्या सुखी संसारचं सीक्रेट प्रिया बापटने केलं उघड, चाहते म्हणाले- बेस्ट जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:36 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत आणि ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. प्रियाने नुकताच तिचा आणि उमेशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओतून प्रियाने सुखी संसार होण्यामागचं सीक्रेट सांगितलं आहे. 

या व्हिडीओ उमेश बेडवर झोपलेला दिसतोय तर प्रिया सांगतेय संसार यशस्वी होण्यासाठी दोघांपैकी एकजण बोरिंग लागते यावेळी ती उमेशकडे बोट दाखवतं तर दुसरा क्रेझी लागतो माझ्यासारखा. प्रिया आणि उमेशचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. बेस्ट जोडी, स्वीट,सुपर, सो क्युट अशा कमेंट्स त्यांच्या या व्हिडीओवर येतायेत.

 

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने खूप अगोदरपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी होकार दिला.

उमेश आणि प्रिया यांच्या वयात आठ वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षांचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर २०११ साली लग्न केले. 

 

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत