Join us  

लाल रंगाच्या साडीत खुललं प्रियाचं सौंदर्य, फोटो पाहताच तुम्हीही पडला तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 11:46 AM

काही तासांच्या आता या फोटोला इतके हजार लाईक्स मिळाले आहेत.

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. 

नुकताच प्रियाने तिचा ट्रेडिंशनल अंदाजातला फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियाने लाल रंगाची साडी परिधान केला आहे. हा रंग प्रियाच्या सौंदर्याला चार चाँद लावतोय. लाल रंगाच्या साडीत प्रिया खूपच सुंदर दिसते आहे.  प्रियाचा हा ट्रेडिंशनल लूक फॅन्सनासुद्धा आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली.

'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवली आहे. सध्या रसिकांच्या विशेष पंसतीस पडत असलेले 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या माध्यमातून उमेश कामतसोबत प्रियाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत