Join us

प्रिया बापटने दिल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोशल मीडियावर होतंय लेकीचं कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 16:33 IST

अभिनेत्री प्रिया बापटच्या आईचा आज वाढदिवस असून नुकतेच तिने सोशल मीडियावर आईचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री प्रिया बापटच्या आईचा आज वाढदिवस असून नुकतेच तिने सोशल मीडियावर आईचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. तिने या पोस्टमध्ये आईबद्दल भरभरून सांगितले आहे. तिची ही पोस्ट पाहून सध्या तिचे खूप कौतूक होत आहे.  

प्रिया बापटने आईचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून सांगितले की लहानपणापासूनच तिला आईबद्दल जास्त माया आहे व पुढे म्हणाली की, 'माझी भावंड मला आईचे शेपूट म्हणून चिडवायचे आणि लहानपणापासून ९९% गोष्टीवर आई आणि माझे एकमत असायचे. मी आजूबाजूला पाहिलेल्या आणि समजून घेऊ शकलेल्या सर्व स्त्रियांमध्ये सर्वांत प्रेमळ, सहनशील, जिद्दी स्त्री म्हणजे माझी आई. तिच्या नाजूक तब्येतीमुळे तिला पाहिजे तसे शिक्षण पूर्ण करू शकली नाही. पण आपण कुठे मागे पडता कामा नये म्हणून आम्ही मोठे झाल्यावर आमच्या मदतीने तिने इंग्रजीचे धडे गिरवले. मला आठवते शाळेत अभ्यासाला असलेली प्रत्येक कविता आणि अभंग आम्हाला आईनेच शिकवलेत.'

सुगरण या शब्दाची व्याख्या प्रियासाठी तिची ‘आई’ आहे. आईच्या हातचे ब्रेड रोल, गुळाची पोळी, चकल्या जगात भारी! असे प्रिया सांगत होती. पुढे म्हणाली की, 'कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे, त्यात आनंद शोधून जगण्याची हिंमत ती कुठून आणते तिलाच ठावूक. मी वयाने कितीही मोठी झाले तरीही आईच्या मांडीवर डोके ठेवून लाड करून घेणे यासारखे सुख नाही. आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!'

प्रियाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव तर होत आहे. त्याशिवाय तिचे कौतूक देखील होत असल्याचे पाहायला मिळते आहे.

टॅग्स :प्रिया बापट