Join us
Daily Top 2Weekly Top 5

Priya Bapat Birthday Special : अभिनयासोबतच या कलेत पारंगत आहे प्रिया बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 14:34 IST

प्रिया खूप चांगली अभिनेत्री आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण त्याचसोबत ती आणखी एका कलेत पारंगत आहे.

ठळक मुद्देप्रिया खूपच चांगली गायिका असून तिने गायनाचे शिक्षण देखील घेतले आहे. शुभदा दादरकर यांच्याकडून तिने दोन वर्षं नाट्य संगीताचे धडे गिरवले आहेत. तसेच प्रसिद्ध शास्त्रीय गायिका उत्तरा केळकर यांच्याकडून देखील तिने गायन शिकले आहे.

प्रिया बापटचा आज म्हणजेच १८ सप्टेंबरला वाढदिवस असून टाइमपास, वजनदार, काकस्पर्श, आम्ही दोघी यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात तिने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. 

प्रिया बापट ही मुळची मुंबईची असून तिच्या वडिलांचे नाव शरद बापट तर आईचे नाव स्मिता आहे. प्रियाला एक बहीण असून तिचे नाव श्वेता आहे. ती स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनर असून ती प्रियासाठी ड्रेस डिझाईन करते. प्रियाने शालेय जीवनापासूनच तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती शाळेत असताना तिने वाटेवरती काचा गं... या नाटकात काम केले होते. 

प्रियाने चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. नवा गडी नवं राज्य या नाटकात तसेच अधुरी एक कहानी, शुभंकरोती, दे धमाल, आभाळमाया यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. प्रिया खूप चांगली अभिनेत्री आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण त्याचसोबत ती आणखी एका कलेत पारंगत आहे. ती एक खूपच चांगली गायिका असून तिने गायनाचे शिक्षण देखील घेतले आहे. शुभदा दादरकर यांच्याकडून तिने दोन वर्षं नाट्य संगीताचे धडे गिरवले आहेत. तसेच प्रसिद्ध शास्त्रीय गायिका उत्तरा केळकर यांच्याकडून देखील तिने गायन शिकले आहे. तसेच शिवाजी पार्क विद्यालयात देखील तिने शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. प्रियाचा आवाज खूपच छान असून तिचा आवाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.

प्रियाचे लग्न अभिनेता उमेश कामतसोबत झाले असून त्या दोघांमध्ये आठ वर्षांचे अंतर आहे. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील मोस्ट लव्हेबल कपल मानले जाते. प्रिया आणि उमेश यांचा प्रेमविवाह झाला असून त्यांची जोडी त्यांच्या फॅन्सना खूपच आवडते. काही महिन्यांच्या नात्यानंतर त्या दोघांनी ऑक्टोबर २०११ मध्ये लग्न केले होते. 

टॅग्स :प्रिया बापट