Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचा रंजक प्रवास घडवणारी 'प्रेमवारी' या तारखेला रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 15:18 IST

या सिनेमात चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय बऱ्याच दिवसांनी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

"प्रेमवारी" या चित्रपटाचा अतिशय सुंदर ट्रेलर चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच रिलीज करण्यात आला. प्रेम या छोट्याशा शब्दाची न सांगता येणारी अशी व्यापक व्याख्या आहे. आणि 'प्रेम' ह्या शब्दाला कोणत्याच चौकटीत पूर्णपणे बसवता येत नाही. याच प्रेमाला असंख्य अशी रूपे आहे त्यातील एका रूपाचे दर्शन आपल्याला या चित्रपटातून घडणार आहे. राहुल आणि पूजा यांची कॉलेज मध्ये होणारी भेट, त्यातून फुलत जाणारं प्रेम पण, याच प्रेमात काही गोष्टी अडसर ठरायला लागतात आणि काही कारणामुळे परिवाराकडून होणारा विरोध या सर्व अडथळ्यामुळे  पुढे ह्या प्रेमाचा प्रवास कसा होतो ते आपल्याला चित्रपटातच पाहावे लागेल. यापूर्वी देखील कॉलेज जीवन आणि त्यात  होणारे प्रेम  यावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले आहे. पण हा चित्रपट इतर चित्रपटापेक्षा नक्कीच वेगळा ठरणार आहे.

या सिनेमात  चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय बऱ्याच दिवसांनी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मयुरी कापडणे च्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन चेहरा मिळणार आहे. 'प्रेमवारी' हा सिनेमा व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी ला हा  सिनेमा रिलीज होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे. या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले. या सुंदर चित्रपटाचे  लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.

 

टॅग्स :चिन्मय उद्गगिरकर