Join us

​चिठ्ठीतून उलगडणार हळवी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 13:48 IST

 मराठी चित्रपट हा आशयघन असल्याचे नेहमीच बोलले जाते. आपल्या चित्रपटांच्या कथा या प्रेक्षकांच्या मनाला भिडणाºया असतात. आणि म्हणुनच आज ...

 मराठी चित्रपट हा आशयघन असल्याचे नेहमीच बोलले जाते. आपल्या चित्रपटांच्या कथा या प्रेक्षकांच्या मनाला भिडणाºया असतात. आणि म्हणुनच आज मराठी सिनेमांनी परदेशात देखील भरारी घेतल्याचे आपण पाहतो. पुन्हा एकदा असाच एक हटके विषय चिठ्ठी नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसे बघायला गेले तर आता सोशल मिडियाच्या जमान्यात चिठ्ठ्या या एकदमच गायब झाल्या आहेत. आता मेसेजमुळे पत्र आणि चिठ्ठ्या कोणीच कोणाला पाठवत नाही. चिठ्ठी या चित्रपटातून देखील एक हळवा विषय प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. 'चिठ्ठी' या चित्रपटात एकाचे प्रेमपत्र वेगळ्याच व्यक्तीला मिळाल्यामुळे उडालेल्या गोंधळाचे चित्रण असले तरी हा चित्रपट ग्रामीण भागातील रोजच्या जगण्यातील सामान्य माणसांशी जवळीक साधणारा आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव डांगे यांनी सांगितले.पंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'चिठ्ठी' या सिनेमाचा उलगडा करण्यात आला. यी चित्रपटात आपल्याला अभिनेते श्रीकांत यादव, शुभंकर एकबोटे, अभिनेत्री अश्विनी गिरी , धनश्री कडगावकर हे कलाकार दिसणार आहेत.  ही 'चिठ्ठी' चित्रपटातील अनेक पात्रांशी निगडित राहते. शिवाय निरक्षर महिलेमुळे 'चिठ्ठी' प्रकरणाचा गैरसमजुतीमुळे जो गोंधळ उडतो त्यामुळे चित्रपटाची कथा विनोदी अंगाने जात असली तरी त्यामध्ये ग्रामीण जीवनातही अनेक वास्तव सहज सामोरे येऊन जातात. त्यामुळे चित्रपटाचा आशय अधिक गडद होत जातो. असे डांगे यांनी सांगितले. अभिनेते श्रीकांत यादव म्हणाले, या चित्रपटातील भूमिका अतिशय साधी होती मात्र अशा भूमिका करणे नेहमीच अवघड जाते त्यामुळे खूप वर्षांनी एक चांगला चित्रपट केल्याचे समाधान मिळाले. चित्रीकरणाच्या आधीच झालेल्या कार्यशाळेत वेगवेगळी नाती तयार झाल्याने लहान मुलांबरोबर काम करताना सोपे गेले असेही त्यांनी सांगितले. तर अभिनेत्री अश्विनी गिरी यांनी या चित्रपटातली अशिक्षीत महिलेची भूमिका करणे तसे आव्हानात्मक होते परंतु निरीक्षणामुळे ते शक्य झाले आणि एक वेगळी भूमिका केल्याचे समाधान मिळाले.