Join us

​प्रार्थना झाली एक्सायटेड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 03:21 IST

        आपल्या आगामी चित्रपटाची रिलिझिंग डेट जसजशी जवळ येते तसेच त्या चित्रपटातील स्टारकास्टची धडधड आपोआपच वाढते. असेच ...

        आपल्या आगामी चित्रपटाची रिलिझिंग डेट जसजशी जवळ येते तसेच त्या चित्रपटातील स्टारकास्टची धडधड आपोआपच वाढते. असेच काही झाले आहे, प्रार्थना बेहेरे सोबत. मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस सदाचारी या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रार्थना भलतीच एक्सायटेड झाली आहे. माझा चित्रपट रिलिझ व्हायला आता काहीच क्षणांचा अवधी राहिला आहे असे ती टष्ट्वीटरवरुन तिच्या फॅन्सला सांगत आहे.       प्रार्थना एवढी नर्व्हस झाली आहे कि ती तिच्या चाहत्यांना  म्हणत आहे, गाईज विश मी लक. इतकेच नाही तर ती पुढे म्हणते, माझ्या पोटात फुलपाखरे उडत असल्यासारखे मला वाटतय. आता बरोबरच आहे म्हणा, चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचा काय मोबदला मिळतोय ते तिला लवकरच समजणार आहे. तिचा चित्रपट पाहुन तिचे  फॅन्स तिला बेस्ट लक करताय का ते पाहुयात.