Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रार्थना बेहरेचा दिग्दर्शक अभिषेक जावकरसोबत झाला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 13:52 IST

प्रार्थना बेहरेने पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर 'जय ...

प्रार्थना बेहरेने पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत तिने रसिकांची मने जिंकली. यानंतर 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. आज प्रार्थनाचे फॅन फॉलोव्हिंग प्रचंड आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक खूपच चांगली बातमी आहे. प्रार्थनाने दिग्दर्शक अभिषेक जावकरसोबत नुकताच साखरपुडा केला आहे. तिनेच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करून तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. प्रार्थनाने साखरपुड्याचा फोटो पोस्ट करून त्यासोबत आम्ही दोघांनी आयुष्यभर एकत्र राहायचे ठरवले आहे असे कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोत प्रार्थनाने खूपच सुंदर निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे तर अभिषेकदेखील निळ्या रंगाच्या शर्टमध्ये आणि कोटमध्ये दिसत आहे. या फोटोत त्या दोघांची अंगठी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्टिब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या मराठी चित्रपटाची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. १४ नोव्हेंबर २०१७ ला प्रार्थना आणि अभिषेक लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रार्थना आणि अभिषेकचे हे अरेंज मॅरेज असून एका मॅरेज ब्यूरोच्या मदतीने तिची आणि अभिषेकची ओळख झाली. तो दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्यामुळे सध्या ते चांगल्या लोकेशनच्या शोधात आहे.Also Read : अनान या मराठी सिनेमात झळकणार प्रार्थना बेहरे