Join us  

प्रार्थना बेहरेची लगीनघाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 5:15 AM

मराठी कलाकारांनी कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या ...

मराठी कलाकारांनी कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.आता प्रार्थना बेहरे रेशीम गाठीत अडकणार असल्याची गुड न्युज प्रार्थनाने तिच्या चाहत्यांना दिली आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसह 14 नोव्हेंबर 2017 ती लग्नबंधनात अडकणार आहे.ऑगस्टमध्ये प्रार्थना साखरपुडा करणार असून 14 नोव्हेंबर या तारखेचा मुहुर्तावर ती लग्न करणार आहे.विशेष म्हणजे प्रार्थना आणि अभिषेक डेस्टीनेशन वेडींग करणार असल्यामुळे सध्या ती चांगल्या लोकेशनच्या शोधात आहे.प्रार्थनाचे लग्न अरेंज असून एका मॅरेज ब्यूरोच्या मदतीने तिची आणि अभिषेकची ओळख झाली.अभिषेकच्या आवडी निवडी आणि ब-याच गोष्टी खूप कॉमन असल्यामुळे तो चांगला जोडीदार ठरू शकतो त्यामुळे अभिषेकला पसंत केल्याचे प्रार्थनाने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.सध्या दोघेही लग्नाच्या तयारीला लागले आहेत.प्रार्थनाने आधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला.. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.. यानंतर 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी' या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली.. यामुळं तिच्यावर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. आता आपल्या आयुष्याच्या जोडीदारसह या  वैयक्तीक आयुष्य आणि रिल लाइफ आणखी खुलावे याच शुभेच्छा.