Join us  

​प्रार्थना बेहरे सांगतेय, नवरी नटली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 9:54 AM

प्रार्थना बेहेरे १४ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असून तिच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. तिच्या लग्नाला केवळ काहीच दिवस ...

प्रार्थना बेहेरे १४ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असून तिच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. तिच्या लग्नाला केवळ काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. तिच्या लग्नाच्या आधीचे काही विधी देखील आता सुरू झाले आहेत. प्रार्थनानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक फोटो पोस्ट करून याबाबत तिच्या फॅन्सना सांगितले आहे. प्रार्थनाने शेअर केलेल्या फोटोत ती काळ्या-हिरव्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या डोक्याला मुंडावळ्या देखील बांधलेल्या दिसत असून या फोटोत ती हात जोडून बसलेली आपल्याला दिसत आहे. या फोटोसोबत तिने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. त्यात लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून मी लग्नासाठी खूप उत्सुक पण तितकीच नव्हर्सदेखील आहे असे तिने लिहिले आहे. त्याचसोबत मी खूप खूश असून या क्षणी मी अभिषेकला खूप मिस करत असल्याचे तिने तिच्या फॅन्सना सांगितले आहे. प्रार्थनाचे अभिषेक जावकरसोबत लग्न होणार असून अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्टिब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या मराठी चित्रपटाची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. प्रार्थना आणि अभिषेकचे हे अरेंज मॅरेज असून एका मॅरेज ब्यूरोच्या मदतीने तिची आणि अभिषेकची ओळख झाली होती. ते दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा होती. ते कुठे लग्न करणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. त्यांच्या लग्नाचे स्थळ आता ठरले असून ते दोघे गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. प्रार्थनाच्या मराठी इंड्स्ट्रीतील अनेक मित्रमैत्रिणी लग्नाच्या एक दिवस आधी तरी गोव्याला रवाना होणार आहेत. प्रार्थनाच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. प्रार्थनाच्या लग्नासाठी तिच्या इतकेच तिचे इंडस्ट्रीतील फ्रेंड्स देखील उत्सुक आहेत. प्रार्थना बेहरेने पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत तिने रसिकांची मने जिंकली. यानंतर 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. Also Read : रेशीमगाठीत अडकण्याआधी प्रार्थना बेहरेच्या मनात काय सुुरु आहे,जाणून घ्या