Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण कुवर यांचे नवे धम्माकेदार गाणे 'तू माझी ब्युटीक्वीन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 13:30 IST

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या स्वरसाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक प्रवीण कुवर आणखी एक नवे कोरे गाणे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ठळक मुद्दे'तू माझी ब्युटीक्वीन' या गाण्यामधून केला आगळावेगळा प्रयोग 'तू माझी ब्युटीक्वीन' या गाण्यात झळकणार अभिनेता किशोर बोरकर

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या स्वरसाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक प्रवीण कुवर आणखी एक नवे कोरे गाणे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तू माझी ब्युटीक्वीन' असे या गाण्याचे नाव असून सृष्टी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याच्या ध्वनीमुद्रण नुकतेच पुण्यातील व्हीएसएच स्टुडिओ येथे पार पडले.

झी मराठीवरील लोकप्रिय 'लागिर झालं जी' या मालिकेचे टायटल साँग तसेच 'ये रे ये रे पैसा' या चित्रपटाचे टायटल साँग आणि 'लव्ह लफडे' या सिनेमातील 'ताईच्या लग्नाला' यांसारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक प्रवीण कुवर आणखी एक धमाकेदार गाणे घेऊन येत आहेत. 'तू माझी ब्यूटीक्वीन' हे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या सुरेल आवाजाने प्रवीण कुवर यांनी आपला स्वतःचा असा एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत असतात. या गाण्यातून अभिनेता किशोर बोरकर झळकणार आहे.'तू माझी ब्युटीक्वीन' हे नॉन फिल्मी गाणे सर्वांना थिरकायला भाग पाडेल यात जराही शंका नाही. या गाण्यामधून नवीन आणि आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. हे गाणे म्हणजे रसिकांसाठी सरप्राइज असेल. या गाण्याचे गीतकार राहुल सूर्यवंशी असून विनय देशपांडे यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे. सृष्टी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याला कार्यकारी निर्माता म्हणून सचीन गवारे तर नृत्य दिग्दर्शन दिपक कुमार हे करणार आहेत. निर्माता काशिनाथ कुढाले असून तर दिग्दर्शनाची बाजू किरण शशिकांत जाधव हे संभाळणार आहेत. 'तू माझी ब्युटीक्वीन' या गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.