Join us

प्रथमेश परबचा स्टायलिश अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 12:35 IST

आपल्या अभिनयाने अभिनेता प्रथमेश परब याने प्रेक्षकांना प्रेमात पाडले आहे. म्हणूनच टाईमपास या चित्रपटातून नावारूपाला आलेला आणि प्रत्येक घराघरात ...

आपल्या अभिनयाने अभिनेता प्रथमेश परब याने प्रेक्षकांना प्रेमात पाडले आहे. म्हणूनच टाईमपास या चित्रपटातून नावारूपाला आलेला आणि प्रत्येक घराघरात पोहोचलेली त्याची दगडूची भूमिका आज ही प्रेक्षक विसरले नाहीत. त्याने साकारलेली दगडू ची भूमिका असो किंवा बालक पालक मधली विशूची भूमिका असो प्रत्येकवेळी त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचबरोबर प्रथमेश ने चित्रपटाचा हिरो असा हि असतो हे प्रत्येकालाचं दाखवून दिले.          अंगाने बारीक दिसायला सामान्य मुलासारखा परंतु मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर आज हाच चेहरा अवघ्या महाराष्ट्राचा लाडका प्रथमेश परब अ‍ॅक्टिंग आयकॉन झाला. प्रथमेश प्रत्येक वेळेस त्याच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन घेऊन आलाय. मग तो एखादा चित्रपट असो किंव्हा एखाद गाणं प्रथमेश च्या चाहत्यांमध्ये नेहमीच त्याच्या प्रोजेक्टला घेऊन उत्सुकता असते. नुकतंच झी युवा वर प्रदर्शित झालेले त्याचे प्रेम हे गाणं लाँच होऊन सध्या ते खूप गाजतंय.           आता, त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे नुकतंच प्रथमेशचं डिजिटल कॅलेंडर लॉन्च झालंय. साधा भोळा दिसणाºया प्रथमेशचं हे फोटोशूट मध्ये एक वेगळंच रूप प्रेक्षकांना दिसणार आहे. या नवीन फोटोशूट मध्ये प्रथमेश कोणत्या बॉलीवूड हिरो पेक्षा कमी दिसत नाहीये हे तितकंच खर. आणि या फोटोची जादू फोटोग्राफर प्रदिप इंगळे यांनी केली आहे. तसेच डिजिटल कॅलेंडर फोटोशूटचं दिग्दर्शन विवेक माणगावकर यांचे आहे. हा इव्हेन्ट द ग्रिल हाऊस ठाणे येथे पार पडला. या इव्हेंटला कांचन पगारे,आशिष पाटील,सुकन्या काळन,आणि चिराग पाटील यांनी उपस्थिती दर्शवली.