Join us

Prathamesh Parab : प्रथमेशच्या लग्नाचं गुपित आलं समोर ! पुढील वर्षी चढणार बोहल्यावर पण तेही 'तुरुंगात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 14:30 IST

अभिनेता प्रथमेश परबने २ दिवसांपूर्वी पोस्ट करत लग्नाला यायचं हं असं आमंत्रण दिलं होतं. त्याची पोस्ट बघून चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लावले होते.

अभिनेता प्रथमेश परबने २ दिवसांपूर्वी पोस्ट करत लग्नाला यायचं हं असं आमंत्रण दिलं होतं. त्याची पोस्ट बघून चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लावले होते. प्रथमेशच्या आयुष्यात खऱ्याखुऱ्या पराजूची एंट्री तर झाली नाही ना असे अनेकांना वाटले. तर प्रथमेश खऱ्या आयुष्यात नाही मात्र रुपेरी पडद्यावर बोहल्यावर चढताना दिसणार आहे. 'ढिशक्यांव' या आगामी चित्रपटात प्रथमेश मुख्य भुमिकेत दिसत आहे.

प्रथमेशने आगामी 'ढिशक्यांव' या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट केलं. यामध्ये प्रथमेश मुंडावळ्या बांधून लग्नासाठी तयार दिसतोय पण लग्नमंडपात नाही तर तुरुंगात. प्रथमेशची बायको सुद्धा तुरुंगात दिसतेय आणि तिच्या हातात चक्क बंदूक आहे. तर प्रथमेश सोबत एक त्याचा मित्रही दिसत आहे. एकाची मस्ती, आन दुसऱ्याची ट्यांव-ट्यांव,इश्काच्या जेलमध्ये, नुसताच ढिशक्यांव! असे भन्नाट कॅप्शन देत पोस्टर टाकण्यात आलं आहे. हा नेमका गोंधळ काय आहे हे १० फेब्रुवारी २०२३ लाच कळेल.

यंदाच्या दिवाळीत प्रथमेशने एका मुलीसोबत फोटो पोस्ट करुन चाहत्यांना सरप्राईजच दिले होते. क्षितिजा घोसाळकरसोबत त्याने दिवाळीला फोटो टाकला होता.चाहत्यांनी तर प्रथमेशला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. प्रथमेशला खऱ्या आयुष्यातली प्राजू भेटली अशा शब्दात प्रथमेशच्या या पोस्टचे स्वागत करण्यात आले. मात्र प्रथमेशचं हे लग्न खऱ्या नाही तर रुपेरी पडद्यावर ठरलं आहे हे स्पष्ट झालंय.

टॅग्स :प्रथमेश परबमराठी अभिनेता