Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बायको मनापासून अभिनंदन...', मुग्धा वैशंपायनला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर पती प्रथमेशची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 11:01 IST

मुग्धाच्या आयुष्यात एक आनंदाची गोष्ट घडली आहे.

मराठी संगीत विश्वातील एक तरुण लोकप्रिय गायकांची जोडी म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. लग्न झाल्यापासून दोघेही कायम चर्चेत असतात. लग्नानंतर मुग्धाच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची गोष्ट घडली आहे. मुग्धाला भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवी परिक्षेत सुवर्ण पदक मिळालं आहे. सोशल मीडियावरून सर्वत्र तिच्यावर  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यासोबतच पती प्रथमेश लघाटेनं खास पोस्ट करत लाडक्या बायकोचं कौतुक केलं. 

मुग्धा वैशंपायननं भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळवले आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात मुग्धाला गोल्ड मेडल प्रदान करण्यात आलं. यावर तिचा पती आणि गायक प्रथमेश लघाटेने पोस्ट शेअर केली आहे. त्याने मुग्धाचा सुवर्णपदक स्विकारतानाचा आणि ते मिळाल्यानंतरचा फोटो पोस्ट करत लिहलं, 'मनापासून अभिनंदन बायको. आम्हाला तुझा अभिमान आहे'. मुग्धाच्या या सुवर्ण यशाबद्दल तिच्या चाहत्यांनी तिचं अभिनंदन करत तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुग्धा वैशंपायन ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या मंचावरून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं. मुग्धा ही सध्या संगीत क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रातही यशस्वी कामगिरी करताना दिसत आहेत. मुग्धा गेली अनेक वर्षं गाण्याचे विविध कार्यक्रम करत आहे. हे सगळं सांभाळतानाच तिने तिच्या शिक्षणाकडेही अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. अभ्यास, गाण्याचे कार्यक्रम, गाण्याचा रियाज हे सगळं एकत्रित उत्तमरीत्या सांभाळला आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीमराठीमुंबईमुंबई विद्यापीठ