प्रसाद ओकच्या मुलाला दहावीत ९४ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 17:00 IST
नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारी राहणाºया मुलांना दहावीत किती मार्क्स मिळाले याची उत्सुकता प्रत्येकाला असते. त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या सेलेब्रिटींच्या मुलांना किती ...
प्रसाद ओकच्या मुलाला दहावीत ९४ टक्के
नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारी राहणाºया मुलांना दहावीत किती मार्क्स मिळाले याची उत्सुकता प्रत्येकाला असते. त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या सेलेब्रिटींच्या मुलांना किती मार्क्स मिळाले याची उत्सुकता देखील चाहत्यांना लागलेली असते. असाच आपला लाडका अभिनेता प्रसाद ओक याचा मुलगा सार्थक देखील यंदा दहावीत होता. त्याने देखील दहावीच्या परिक्षेत ९४ टक्के मार्क्स मिळवून दणदणीत यश मिळवलं आहे. याबाबत लोकमत सीएनएक्सशी बोलताना प्रसाद ओक म्हणाला, त्याच्या या यशाचे श्रेय पूर्ण त्याच्या आईला जाते.त्याने मिळविलेल्या यशाचा खरचं खूप आनंद व अभिमान वाटतो. त्याच्या फर्स्ट सेमिस्टरनंतर देखील तो म्हणला होता की, मला बोर्डात ९४ ते ९५ टक्के मिळतील. त्याच्या हा आत्मविश्वासाला खरचं दाद दयावी वाटते. आणि माझं म्हणाल तर, माझा आणि अभ्यासाचा बिलकूल काही संबंध नाही. मी जर त्याच्या अभ्यासात लक्ष घातले असते तर त्याला एवढे मार्क्सपण मिळाले नसते. तसेच माझ्या आयुष्यात ९४ हा अंक मी फक्त वर्ष म्हणून पाहिले असल्याचे गंमतीत त्याने सांगितले.