Join us

प्रसाद ओकची पत्नी मंजिरीनं गाठलं केदारनाथ, यंदा मंदिराचे दरवाजे कधी बंद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 18:02 IST

बर्फाच्छादित डोंगर आणि शांत वातावरणातील हे फोटो मन प्रसन्न करणारे आहेत

सध्या सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना मराठमोळ्या अभिनेत्याची पत्नी केदारनाथला पोहचली. प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने  केदारनाथला जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावरुन मंजिरीने केदारनाथ ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 

केदारनाथ यात्रेदरम्यानचे अत्यंत सुंदर फोटो मंजिरीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बर्फाच्छादित डोंगर आणि शांत वातावरणातील हे फोटो मन प्रसन्न करणारे आहेत. मंदिर बंद होण्यापूर्वी मंजिरीने केदारनाथचे दर्शन घेतल्यामुळे तिचा १२ ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा संकल्प लवकरच पूर्ण होईल.

मंजिरी ओक सध्या तिची महत्त्वाची १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण करत आहे. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेत मंजिरीने या १२ ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात केली होती.  जिथे ती प्रसाद ओकसोबत दर्शनासाठी गेली होती. काही दिवसांपूर्वीच तिने वाराणसी येथे काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले होते. दरम्यान, यंदा अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांसारख्या अनेक मराठी सेलिब्रिटींनी केदारनाथला भेट दिली होती.

केदारनाथ मंदिराचे दरवाजे कधी बंद होणार?भाविकांसाठी मोठे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे लवकरच बंद होणार आहेत. दरवर्षी हिवाळ्यात होणाऱ्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी हे मंदिर भाविकांसाठी बंद केले जाते आणि थेट सहा महिन्यांनंतर, म्हणजेच एप्रिल किंवा मे महिन्यात पुन्हा उघडते. यंदा केदारनाथ मंदिराचे द्वार २३ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. त्यापूर्वीच अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Prasad Oak's Wife Manjiri Visits Kedarnath; Temple Closing Date?

Web Summary : Manjiri Oak, wife of actor Prasad Oak, visited Kedarnath. She shared photos of her trip before the temple closes on October 23rd for the winter. Many celebrities have visited Kedarnath recently.
टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटीकेदारनाथ