Join us

गुलाबी साडी ट्रेंड केल्यामुळे मंजिरीवर चिडला प्रसाद; लाइव्ह व्हिडीओमध्ये नेमकं घडलं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 12:07 IST

Prasad oak: मंजिरीने 'गुलाबी साडी' या गाण्यावर ट्रेंड फॉलो केला. मात्र, ऐनवेळी प्रसादने त्याला चांगलाच ट्विस्ट दिला.

 मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे प्रसाद ओक (prasad oak) आणि मंजिरी ओक (manjiri oak). कलाविश्वात सक्रीय असलेली ही जोडी सोशल मीडियावरही कमालीची अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे ते कायम नवनवीन ट्रेंड फॉलो करत असतात. यामध्येच त्यांनी नुकताच  गुलाबी साडी हा व्हायरल ट्रेंड फॉलो केला. मात्र, यात प्रसादने ऐनवेळी चांगलाच ट्विस्ट दिला.

सध्या सोशल मीडियावर संजू राठोड याचं गुलाबी साडी आणि लाली लाल लाल हे गाणं प्रचंड गाजत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्या गाण्यावर रील्स शेअर केले आहेत. यामध्येच आता मंजिरीला देखील या गाण्यावर व्हिडीओ करायचा मोह आवरला नाही. त्यामुळे तिने सुद्धा हा ट्रेंड फॉलो केला. मात्र, ऐनवेळी प्रसादने व्हिडीओमध्ये येत तिच्या व्हिडीओ डिस्टर्ब केला. परंतु, त्याची ही एन्ट्रीही लोकांना भलतीच आवडली आहे.

मंजिरी काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये हा ट्रेंड फॉलो करत होती त्याच वेळी प्रसाद तिच्या समोर येतो आणि, त्याच्या हातातली एक गुलाबी बॅग तिला दाखवतो. तसंच हा खरा गुलाबी रंग आहे. असं तिला सांगतो. 

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत “फक्त गुलाबीवर का चिडला हा? साडी तरी कुठे आहे?” असं मजेशीर कॅप्शन मंजिरीने दिलं आहे. सध्या या जोडीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्यापूर्वी अनेक कलाकारांनी या गाण्यावर भन्नाट रिल्स केले आहेत.

टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा