Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कष्टांचं चीज झालं...' प्रसाद ओकने शेअर केला मुलाच्या पदवीदान समारंभाचा खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 17:06 IST

प्रसादचा मुलगा सार्थकने परदेशातील विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय.

प्रसाद ओक मराठीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसादने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रसाद सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतेच प्रसादचा मुलगा सार्थकने परदेशातील विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय.  सार्थकच्या पदवीदान समारंभाचा एक खास व्हिडीओ प्रसादने शेअर केला आहे.

या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये प्रसादने लिहले की, 'सार्थक चा “पदवी प्रदान समारंभ” सार्थक…आम्हा सगळ्यांपासून खूप लांब राहून शिक्षण घ्यायचा निर्णय तू अत्यंत धाडसानी घेतलास… खूप कष्ट केलेस… खूप अभ्यास केलास…!!! आज हे क्षण पाहताना तुझ्या निर्णयाचं आणि कष्टांचं चीज झालं असं मनापासून वाटतंय. तुझ्या पुढच्या प्रवासाला अगणित शुभेच्छा…!!!'. 

मंजिरी ओक हिनेही खास पोस्ट केली. ती म्हणाली, 'कमाल क्षण , कमाल अनुभव, कमाल भावना, आयुष्याचं #सार्थक झालं!!' मंजिरी आणि प्रसाद दोघांच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता प्रसाद ओकला मयांक आणि सार्थक ही दोन मुलं आहेत. मुलाच्या पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी प्रसाद बायको आणि मयांकसोबत विदेशात गेला होता. विमानातील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.

प्रसादच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो आगामी 'धर्मवीर 2' मुळेही चर्चेत आहे.  या सिनेमात तो पुन्हा एकदा आनंद दिघेंची भूमिका साकारतोय. तसंच महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये तो परिक्षक आहे. याशिवाय प्रसाद स्वप्नील जोशीसोबत जिलबी सिनेमाचं शुटींग करतोय. काहीच दिवसांपुर्वी प्रसादने अमृता खानविलकरसोबत आगामी पठ्ठे बापूराव सिनेमाची घोषणा केली.

टॅग्स :प्रसाद ओक मराठी अभिनेता