Join us

Prasad Oak “माझं काही चुकलं का?”, प्रसाद ओकने विचारला प्रश्न; लोक म्हणाले- घोर चूक केली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 14:45 IST

Prasad Oak : प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. काही तासांमध्येच या व्हिडीओला हजारो व्ह्युज मिळाले आहेत.

प्रसाद ओक (Prasad oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (manjiri oak) दोघंही सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा दोघांचे रिल्सही सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.

प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओद्वारे तो माझं काय चुकलं? असं विचारताना दिसत आहे. प्रसादचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे. या रिलमध्ये बेबी नशीबवानला इंग्रजी भाषेमध्ये काय म्हणतात?, असा प्रश्न विचारला जातायो. यावर उत्तर देताना प्रसाद अविवाहित असं म्हणतोय. 

यारिलमधील प्रसादच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी नक्कीच हसले असतील. तसेच त्याच्या चाहत्यांनीही यावर अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत. घोर चूक केली प्रसाद सरांनी..आग से खेलने का बहुत शौक है इन्हे, कसला भारी आहेस तु, नादखूळा अशा कमेंट्स या रिलवर आल्या आहेत. 

टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटी