Join us

प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 13:10 IST

अक्षय तृतियेच्या मुहुर्तावर प्रार्थनाच्या घरी...

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी कलाविश्वातला लोकप्रिय चेहरा आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून तर तिला कमालीची लोकप्रियता मिळाली. तर नुकतीच ती 'बाई गं','चिकी चिकी बुबूम बूम' या सिनेमांमध्येही दिसली. प्रार्थनाच्या घरी नवा पाहुणा आला आहे. या क्युट छोट्या पाहुण्याचं स्वागत करत प्रार्थनाने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सोबतच तिने नवऱ्याला एक वचनही दिलं आहे. काय आहे तिची पोस्ट पाहुया...

प्रार्थना बेहेरला पाळीव प्राण्याची आवड आहे. लग्नाआधीच तिच्याकडे गब्बर हा श्वान होता. शिवाय नंतर प्रार्थना आणि तिच्या नवऱ्याकडे आणखी ७ कुत्रे, गायू आणि १०-१२ घोडेही आहेत. प्रार्थना गंमतीत मी १५-१६ मुलांची आई आहे असंही म्हणते. तर आता तिच्या मुलांमध्ये आणखी एका सदस्याचं आगमन झालं आहे. एका श्वानाच्या पिल्लाचा क्युट फोटो शेअर करत तिने लिहिले, "माझं आणखी एक बाळ- 'रील'ला भेटा. आपली गरज कोणाला आहे हे कुत्र्यांना बरोबर कळतं. आपल्या नकळत आपल्या आयुष्यातली पोकळी ते भरुन काढतात. अभिषेक, रीलला चांगलं नवीन  घर दिल्याबद्दल आणि बेस्ट आयुष्य दिल्याबद्दल आभार. मी तुला कधीच निराश करणार नाही असं वचन देते."

प्रार्थनाने रील या छोट्या पिल्लाला दत्तक घेतलं आहे. अक्षय तृतियेला तिच्या घरी हा पाहुणा आला. त्याला जवळ घेऊन प्रार्थनाने फोटो पोस्ट केलेत. यात तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पाहायला मिळतोय. तिचा नवरा अभिषेकनेच तिला हे गिफ्ट दिलं आहे. प्रार्थना आणि अभिषेकचं अलिबागला मोठं फार्महाऊस आहे. तिथेही बरेच पाळीव प्राणी आहेत. प्रार्थनाने वेळोवेळी प्राणीप्रेम व्यक्त केलं आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरेकुत्रामराठी अभिनेता