Join us
Daily Top 2Weekly Top 5

मित्रासाठी काय पण, प्रार्थना बेहरेचा 'याराना', बेस्ट फ्रेंडसाठी केले हे खास काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 14:42 IST

महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमूळे या गाण्याचा रिलीज सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देणार असल्याचे प्रार्थनाने म्हटले आहे

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि बॉलीव़ूड निर्माता निखील नमीत गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. सलमान खानची फिल्म बॉडीगार्डमूळे प्रार्थना आणि निखीलची फ्रेंडशीप झाली. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमीत्ताने  प्रार्थनाने निखील नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे ''आपली यारी'' हे गाणे नुकतेच सोशल मीडियाव्दारे रिलीज केले. फ्रेंडशीपडेच्या मुहूर्तावर आलेल्या या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहेत.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, “नादखुळा ह्या निखीलच्या म्युझिक लेबलवर फ्रेंडशीप डे निमीत्ताने आपली यारी हे गाणे लाँच होतंय. आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली, ह्याचा मला आनंद आहे. निखीलची आणि माझी मैत्री खूप जूनी आहे. त्यामूळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचेच गाणे मी लाँच करावे, हा दुग्धशर्करा योग आहे.”

निर्माता निखील नमीत म्हणतात,”आपली यारी गाण्याप्रमाणेच प्रार्थनाची आणि माझी मैत्री पक्की आणि ‘जगात लय भारी’ अशी आहे. त्यामुळेच तिने हे गाणे लाँच करणे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमूळे आम्ही ह्या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देतोय.”

'आपली यारी' गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे. पहिल्यांदाच मराठीमध्ये निक शिंदे, श्रध्दा पवार, बॉब हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे, तृप्ती राणे, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतिक्षा थोरात हे दहा सोशल मीडियाइन्फ्लूएन्सर्स एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत.

प्रशांत नाकती गाण्याविषयी सांगतो, “मराठी चित्रपटांमध्ये आपण दोस्तीवरची गाणी पाहिली आहेत. पण  पहिल्यांदाच मराठीत म्युझिक लेबलचे मैत्रीवरचे गाणे आले आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की, हे गाणे ऐकल्यावर, प्रत्येकाला  आपल्या कॉलेजचे दिवस आणि, आपले जवळचे मित्र-मैत्रिण आठवतील. आम्ही दहा इन्फ्लुएन्सर्सवर हे गाणे चित्रीत केलंय. आणि मला अतिशय आनंद आहे की, ह्या गाण्यामूळे त्या दहाजणांमध्येही एक घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे.”      

टॅग्स :प्रार्थना बेहरे