Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता माळी देणार प्लेझंट सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 11:55 IST

मालिका संपल्यानंतर सर्व मराठी अभिनेत्रींना क्रेझ लागली आहे ती व्यावसायिक रंगभूमीची. तेजश्री प्रधान, शशांक केतकर, ललित प्रभाकर, सुयश टिळक, ...

मालिका संपल्यानंतर सर्व मराठी अभिनेत्रींना क्रेझ लागली आहे ती व्यावसायिक रंगभूमीची. तेजश्री प्रधान, शशांक केतकर, ललित प्रभाकर, सुयश टिळक, सुरूची आडारकर यांच्यापाठोपाठ आता, प्राजक्ता माळी देखील व्यावसायिक रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ती आपल्या चाहत्यांना प्लेझंट सरप्राइज या नाटकातून एक प्रकारचे सरप्राईजच देणार आहे. हे प्राजक्ताचे पहिले व्यासायिक नाटक आहे. यापूर्वी प्राजक्ताची नुकतीच जुळून येतील रेशीमगाठी ही मालिका संपली आहे. आता यानंतर ती रंगभूमीवरकडे वळली आहे. तिचे प्लेझंट सरप्राइज हे नाटक प्रेम या विषयावर आधोरित आहे. यामध्ये प्रेमाचे वेगवेगळे पैलू या नाटकात पाहायला मिळणार आहे. हे नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रतापफड यांनी केले आहे तर या नाटकाचे निर्माते संदेश भट हे आहेत. या नाटकात तिच्यासोबत सौरभ गोखले, मयुरी देशमुख, समीर खांडेकर या कलाकारांचा समावेश आहे.तसेच या नाटकाची निर्मिती सुयोग नाटयसंस्थेकडून करण्यात आली आहे. चला, तर पाहूयात प्राजक्ता माळीचं हे प्लेझंट सरप्राइज तिच्या चाहत्यांना आवडते का?