Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मागच्या जन्माचा शत्रू या जन्मात जोडीदार..." प्राजक्ता माळी प्रेमाबद्दल काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:10 IST

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. यातच प्राजक्तानं प्रेमाविषयी आपलं मत मांडलं आहे.

Prajakta Mali Talks About Love : आपल्या निखळ सौंदर्याने, साध्या आणि तरीही नखरेल अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.  प्राजक्ता माळीची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. प्राजक्ताच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्याचीही चाहत्यांना भलतीच उत्सुकता असते. ३६ वर्षांची प्राजक्ता आजही सिंगल आहे, यावर तिच्या लाखो चाहत्यांचा विश्वास बसत नाही.  सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. यातच प्राजक्तानं प्रेमाविषयी आपलं मत मांडलं आहे. प्रेम ही केवळ क्षणिक भावना नसून, ती मागील जन्मातील कर्मांशी जोडलेली संकल्पना असल्याचं प्राजक्ताने यावेळी सांगितलं.

'मुंबई टाइम्स कार्निव्हल' या कार्यक्रमात प्राजक्ताला प्रेमाबद्दल तिचं मत विचारण्यात आलं असता, ती म्हणाली, “हा विषय सगळ्यांनाच आवडतो, पण तो तितकाच अवघडही आहे. जे लगेच, उत्स्फूर्तपणे वाटतं, ते मला प्रेम वाटत नाही. ते आकर्षण असतं. प्रेम तेव्हाच होतं, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये खोलवर कार्मिक कनेक्शन असतं".

प्राजक्ता माळी म्हणाली, "असी फिलॉसॉफी आहे की की, मागील जन्मातील जो तुमचा शत्रू असतो, तोच या जन्मात तुमचा जोडीदार असतो. जर मागील जन्मातील शत्रूत्व सौम्य असेल, तर या जन्मातलं नातंही तसंच असतं.  माझं जास्त वाचन असल्यामुळे प्रेमाची संकल्पनाच बदलून गेली आहे".

English
हिंदी सारांश
Web Title : Prajakta Mali: Past life enemies become partners in this life.

Web Summary : Actress Prajakta Mali shared her views on love, linking it to past life karma. She believes true love involves a deep karmic connection, not just fleeting attraction, suggesting partners may have been adversaries in a previous existence.
टॅग्स :प्राजक्ता माळी