Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस हॉट अंदाज, ब्लॅक ड्रेस आणि ब्लॅक ड्रॉपवर घायाळ करणाऱ्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 08:00 IST

ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. 

नुकताच प्राजक्ताने काही फोटो शेअर केले असून यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. 'ती पाहता हसीन बाला, कलेजा खलास झाला या ओळी ही आपुसकच तोंडावर येतील असा हा प्राजक्ताचा सेक्सी आणि बोल्ड लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.याआधीही प्राजक्ता माळीचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. रसिकांकडून प्राजक्ताच्या या फोटोंना बरेच लाइक्सही मिळाले होते. आता पुन्हा एकदा प्राजक्ताचा सेन्सेशन्ल बोल्ड अंदाज रसिकांसमोर आला आहे. 

सोशल मीडियावर सध्या प्राजक्ताच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.यातील एका फोटोत प्राजक्ताचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात प्राजक्ताचा हा फोटो आहे. प्राजक्ताच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

टॅग्स :प्राजक्ता माळी