Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हेच खरे कपल गोल्स" आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:35 IST

प्राजक्ता माळीने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा ४१ वा वाढदिवस

प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहायला मिळाली. ती सातत्याने चर्चेत येत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. प्राजक्ता  सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नेहमीच तिच्या हटके पोस्टनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतीच प्राजक्ताने केलेली एक पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे. निमित्त आहे तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या ४१ व्या वाढदिवसाचं.

प्राजक्ताने सोशल मीडियावर आई-वडिलांसोबतचा एक गोड फोटो शेअर करत त्यांना ४१ व्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले, "आई-पप्पा, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... ४१ वर्षे पूर्ण झाली आणि अजून खूप वर्ष यायची बाकी आहेत. हेच खरे कपल गोल्स आहेत. १०-०२-८५ ते १०-०२-२६".

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षावप्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचे आई-वडील अतिशय आनंदी दिसत आहेत. ही पोस्ट पाहताच चाहत्यांनी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्राजक्ताच्या आई-वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Prajakta Mali's special post for parents' wedding anniversary: Couple goals!

Web Summary : Prajakta Mali shared a heartwarming post celebrating her parents' 41st wedding anniversary, calling them true 'couple goals'. The post featured a sweet family photo, drawing warm wishes from fans and celebrities alike.
टॅग्स :प्राजक्ता माळी